यूपीचा परप्रांतीय असल्याने वाडीलासमोर तरुणाला बेदम मारहाण..

Foto
तरुणाचीप्रकृती चिंताजनक...

 वडिलांच्या चष्म्याच्या दुकानातील  काचा आणण्यासाठी बाजार गेलेल्या तरुणाला यु.पी.चा परप्रांतीय असल्याने 5 ते सहा जणांनी लोखंडी रोड ने बेदम मारहाण केल्याची घटना औरंगपुरा भागात घडली. मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.घटनेला 24 तास उलटूनही पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही तरुणावर शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
साहिब अख्तर फहींम अख्तर (वय-20 रा. शहबजार,औरंगाबाद मूळ,उत्तर प्रदेश) असे जखमी  तरुणाचे नाव आहे.

साहिब हा पुणे येथील आय.एच.एम. चा विद्यार्थी असून लॉकडाऊनमुळे तो औरंगाबादेतील घरी आला होता. साहिब व त्याचा परिवार हा मूळ चा उत्तर प्रदेश मधील आहे मागील अनेक वर्षा पासून ते औरंगाबादेत वास्तव्यास आहे.त्याच्या वडिलांची चष्म्याची दुकान आहे.वडील कामात असल्याने चष्म्याला लागणारी काच आणण्यासाठी तो औरंगपुरा येथील काचेच्या ठोक विक्री दुकानात गेला होता.तेथे इतरही ऑप्टिकल व्यवसायिक आले होते.त्यांच्या बोली भाषेवरून ते यूपी चे असल्याचे साहिब ला जाणवले असता तुम्ही यूपी चे आहेत का असे विचारले असता तेथेच साहिब ला मारहाण करण्यात आली.ही बाब वडिलांना माहिती झाल्यावर साहिब चे वडील  त्या तरुणाची समजूत काढण्यासाठी व वाद मिटविण्यासाठी परत तेथे गेले असता वडील समोरच 5 ते 6 तरुणांनी लोखंडी रोड ने बेदम मारहाण केली.या मारहाणीत साहिब हा गंभीररीत्या जखमी झाला.त्याला तरुणांच्या तावडीतून सोडवत वडिलांनी साहिब ला सिटीचौक पोलीस ठाण्यात नेले तेथे साहिब ला रक्ताच्या उलट्या झाल्या हे पाहून तातडीने त्यास घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.साहिबच्या अंतर्गत अवयवांना गंभीर इजा झाल्याने त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.सध्या त्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून साहिब ची प्रकृती चिंताजनक बनली आहे.या घटनेला 24 तास उलटून देखील पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही.

पोलीस आयुक्तांनी प्रकरणात लक्ष घालावे..
माझा मुलगा कधी पर्यंत रुग्णालयात राहील तो कधी चंगला होईल  माहीत नाही. माझ्या समोर माझ्या मुलाला  फक्त यूपी चा असल्याने एवढी अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपिवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी साहिब च्या वडिल फहींम यांनी केली आहे.

जखमी व्हेंटिलेटरवर पोलीस म्हंणतात प्रकरण मिटल.
जखमी साहिबच्या पोटाच्या दोन्ही बाजूनी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचविले आहे.त्यास पोलीस ठाणे आवारातच रक्ताच्या उलट्या झालं.वेळीच दाखल झाल्याने त्याचे प्राण वाचले.पोलीसांनि घाटी रुग्णालयात जाऊन साहिबच्या भेटही घेतली.सध्या तो व्हेंटिलेटरवर आहे.या प्रकरणी सिटीचौक पोलिसांशी संपर्क केला असता काल रात्रीच दोन्ही पार्टीनी प्रकरण आपसात मिटविले आहे.अशी माहिती देण्यात आली.यास जखमीच्या वडिलांनी नकार देत माझा मुलगा मृत्यूच्या धाडीत आहे.आणि मी कसे प्रकरण मिटवू शकतो.हे सर्व खोटे आहे.आरोपी वर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी साहिब चे वडील फहिम यांनी दिली.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker